Advertisement

मुंबईतील खाटांची संख्या १८ हजारांपर्यंत वाढविणार


मुंबईतील खाटांची संख्या १८ हजारांपर्यंत वाढविणार
SHARES

मुंबईत दररोज ३५०० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचं नव्यानं निदान होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खासगी व पालिका रुग्णालयातील खाटांची संख्या साडेबारा हजारांवरून पुन्हा १८ हजारांवर नेण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत. मुंबई उपनगरीय रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी ७९१ खाटा २ दिवसांत सुरू करण्याचे आदेशही महापालिकेनं दिले आहेत.

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरातच १८६ दिवसांवरून ९७ दिवसांवर आला आहे. दरदिवशी नव्यानं निदान होणाऱ्या रुग्णसंख्येचे आत्तापर्यंतचे सर्व विक्रम गेल्या आठवड्यात मोडीत काढून मुंबईनं साडेतीन हजारांचा टप्पा पार केला आहे. यातील बहुतांश रुग्ण लक्षणंविरहित किंवा सौम्य लक्षणं असणारे असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही दुपटीनं वाढलं आहे.

मुंबईतील मोठ्या कोरोना रुग्णालयात दरदिवशी जवळपास १०० ते १५० रुग्ण दाखल होत आहेत. या अनुषंगानं या आठवड्यात शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयातील खाटांची क्षमता १० जुलै २०२० प्रमाणे करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

मुंबईत के.बी.भाभा रुग्णालय (वांद्रे), स.का.पाटील रुग्णालय (मालाड), डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली शताब्दी), भगवती रुग्णालय, के.बी. भाभा (कुर्ला), माँ रुग्णालय (चेंबूर), मदन मालवीय रुग्णालय (गोवंडी), राजावाडी रुग्णालय (घाटकोपर) आणि एम.टी.अगरवाल (मुलुंड) या ९ उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांसाठी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी या रुग्णालयांना २ दिवसांत खाटा उपलब्ध करून सोमवारपासून रुग्ण घेण्यास सुरुवात करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत.

रुग्णालयांमधील ऑक्सिजन, अतिदक्षता खाटा, साधनसामुग्री, पूरक मनुष्यबळ इत्यादी व्यवस्था युद्धपातळीवर करावी व सोमवारपर्यंत याची माहिती महापालिकेला देण्याच्या सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत. प्रत्येक विभागात १ किंवा २ कोरोना दक्षता केंद्र (सीसीसी) १ आणि २ कार्यान्वित करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत.



हेही वाचा -

रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा