Advertisement

मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या घटली

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे.

मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या घटली
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे. मुंबईतल्या कोरोनाच्या कन्टेंटमेंट झोनची संख्या आता घटली आहे. 231 कन्टेंटमेंट झोन डिकन्टेंट झाले आहेत.

या 231 कन्टेंटमेंट झोनमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कन्टेंटमेंट झोनच्या यादीतून हे भाग वगळले आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले ते भाग मुंबई महापालिकेने कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या 1026 पर्यंत पोहोचली होती. या भागामध्ये अनेक निर्बंध लागू केले जातात.

मुंबईतील वेगवेगळ्या विभागांमध्ये असणाऱ्या 231 झोनला कन्टेंटमेंट यादीतून वगळले असले तरी लॉकडाऊनचे नियम मात्र त्यांना पाळावेच लागणार आहे. आता मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या 805 एवढी झाली आहे. डिकन्टेंट झालेल्या झोनमध्ये मुंबईतील विविध वॉर्डमधील झोनचा समावेश आहे. मुंबई हे कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे 5407 रुग्ण आहेत. यापैकी 204 जणांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा