Advertisement

'या' भागात कोरोना रुग्णसंख्या 3 हजारांच्या वर

आतापर्यंत कमी रुग्ण असलेल्या दहिसर म्हणजेच आर मध्य प्रभागातील रुग्णसंख्या 868 वर पोहोचली आहे.

'या' भागात कोरोना रुग्णसंख्या 3 हजारांच्या वर
SHARES

मुंबईत कोरोना हाॅटस्पाॅट ठरलेल्या जी उत्तर प्रभागात कोरोना रुग्णांच्या संख्येनं आता 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  धारावी, माहीम, दादर आदी भागांचा समावेश असलेल्या जी उत्तर प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या 3065 झाली आहे. त्याखालोखाल कुर्लामध्ये 2668 रुग्ण आहेत. तर 9 प्रभागात 2000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

आतापर्यंत कमी रुग्ण असलेल्या दहिसर म्हणजेच आर मध्य प्रभागातील रुग्णसंख्या  868 वर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सर्वात कमी 300 रुग्ण होते. सध्या सी वॉर्डात सगळ्यात कमी 432 रुग्ण आहेत. दरम्यान कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला मानखुर्द-शिवाजीनगर व गोवंडी परिसरात कोरोनाला अटकाव घालण्यात यश आलं आहे. एम पूर्व वॉर्डांतर्गत येणाऱ्या या भागातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग २० दिवसांवर आला आहे. हा दर मुंबईच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. येथील ६० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे आशादायी चित्र आहे. दाटीवाटीचा भाग असलेल्या मानखुर्दचा मृत्यूदर मागील आठवड्यापर्यंत नऊ टक्के होता. 

मरुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन मुंबईतल्यी बीकेसी मैदानावर 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी अतिशय वेगात सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या मदतीने हे तात्पुरतं हॉस्पिटल उभारलं जात आहे. याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे.


हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा