Advertisement

'या' 2 वॉर्डमध्ये 1 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारांच्या वर गेली आहे. तर मुंबईतील हा आकडा 5 हजारांच्या वर आहे.

'या' 2 वॉर्डमध्ये 1 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारांच्या वर गेली आहे. तर मुंबईतील हा आकडा 5 हजारांच्या वर आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.  मुंबईतील एकूण 24 वॉर्डपैकी 2 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 1 हजारांहून अधिक आहे.

मुंबईत जी दक्षिण आणि ई वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. जी दक्षिण वॉर्ड (वरळी, लोअर परेल) मध्ये 600 तर ई वॉर्ड (भायखळा, मुंबई सेंट्रल) मध्ये रुग्णांचा आकडा 466 आहे.या दोन वॉर्डमधली एकूण रुग्णांची संख्या ही 1 हजारांहून अधिक झाली आहे.

के वॉर्ड( अंधेरी-जुहू- वर्सोवा), एल वॉर्ड ( कुर्ला- साकिनाका), एफ वॉर्ड( माटुंगा- सायन), जी ईशान्य वॉर्ड धारावी- माहिम) या प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांचा आकडा हा 350 च्या
आसपास आहे. एकट्या धारावीत 24 तासांत कोरोना विषाणूची बाधा झालेले 34 रुग्ण समोर आले. धारावीत रुग्णांची संख्या ही 275 वर पोहोचली आहे तर 14 जणांचा
इथे मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 27 हजारांवर पोहचला आहे. तर
872 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा