Advertisement

लक्षणं असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट

कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांना २४ जूनच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होण्याची इतकी आवश्यकता नाही.

लक्षणं असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट
SHARES

COVID 19 रुग्णांचा आकडा मुंबईत अधिक आहे यात काही शंका नाही. लॉकडाऊन लागू करण्यात आला असला तरी रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लोकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे उपलब्ध आकडेवारीवरून असं दिसून आलंय की, कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांना २४ जूनच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होण्याची इतकी आवश्यकता नाही.

पालिकेच्या या आकडेवारीनुसार, व्हायरसची पॉझिटिव्ह चाचणी करणाऱ्या १,००० ते १,२०० लोकांपैकी केवळ १५० ते १८० लोकांना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहेत. २ जूनपर्यंतच्या आकडेवाडीनुसार, ३० हजार ०६३ रुग्णांपैकी ११ हजार ६४१ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहे. तर ९६३ रुग्ण गंभीर आजारी आहेत. तर, २१ जुलैपर्यंत, २३ हजार ८६५ रुग्णांपैकी ५ हजार २५२ रुग्ण बरे झाले. यापैकी १ हजार २८६ रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याचं समजलं आहे.

हेही वाचा : बोरिवली, कांदिवलीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात कमी

जूनच्या आकडेवारीच्या तुलनेत गंभीर रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी, लक्षणामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील खासगी आणि पालिका रुग्णालयांवरील संभाव्य भार कमी होईल.

यासंदर्भात एक वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी म्हणाले की, “आता कोरोना रोग्यांची संख्या कमी होत आहे. जरी आपण चाचण्यांची संख्या वाढवली आणि पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली तरीही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढू शकत नाही. ”

मुंबईत हॉस्पिटल बेडची उपलब्धता (23 जुलै पर्यंत):

  • COVID 19 रुग्णांसाठी राखीव बेड्सची संख्या : २२ हजार १५७
  • सध्या ताब्यात असलेले बेड्स : १२ हजार ००२

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या आकडेवारीमध्ये सध्या ९० टक्के व्हेंटिलेटर बेड आणि आयसीयूवर ताबा आहे. तर ४० टक्के प्रमाणित आणि ऑक्सिजन बेड सोडण्यात आले आहेत.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३६६ नवीन रुग्णांची नोंद

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा