Advertisement

बोरिवली, कांदिवलीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात कमी

बीएमसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरिवली आणि कांदिवलीमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी दिवसांत दुप्पट होत आहे.

बोरिवली, कांदिवलीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात कमी
SHARES

मुंबईत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारपर्यंत मुंबईतील एकूण रूग्णांची एकूण संख्या १,०४,५७२ वर पोहोचली आहे. यामधील आतापर्यंत ७५,११८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत सध्या २३,५८२ रुग्ण उपचार घेत आहेत. बीएमसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरिवली आणि कांदिवलीमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी दिवसांत दुप्पट होत आहे. म्हणजे या ठिकाणचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मुंबईत सर्वात कमी आहे. 

बीएमसीने १४ जुलै ते २१ जुलै या कालावधीत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बोरिवलीमध्ये ३२ दिवसात आणि कांदिवलीमध्ये ३५ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. २१ जुलैपर्यंत बोरिवलीमध्ये एकूण रुग्णांची संख्या ४६७४ आहे.  तर १४ जुलै रोजी बोरिवलीमध्ये रुग्णांची संख्या ४०१४ होती. बोरिवलीतील कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ३२ दिवस आहे. कांदिवलीत १४ जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०९६ होती, ती २१ जुलै रोजी ४४८२ पर्यंत वाढली. कांदिवलीमध्ये कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ३५ दिवस आहे. 

दरम्यान, बोरिवलीतील परिस्थिती सुधारत आहे. बोरिवलीमध्ये गेल्या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या २८ दिवसांत दुप्पट होत होती. आता कोरोना रूग्णांची संख्या ३२ दिवसांत दुप्पट होत आहे. ६ जुलै रोजी बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ३२६५ होती, तर १३ जुलै रोजी कोरोना रूग्णांची संख्या वाढून ३८८९ वर गेली. 



हेही वाचा -

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा