Advertisement

मुंबईत १३१० कोरोनाचे नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू

बुधवारी दिवसभरात १५६३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७५ हजार ११८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत १३१० कोरोनाचे नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज पहिल्यादांच एका दिवसात कोरोना रुग्णांनी १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज कोरोनाने २८० जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण (Control over the coronaviris ) मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात १३१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत (Coronavirus pandemic)रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-युएईमध्ये होणार आयपीएलचा 13वा हंगामा

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर (Corona death stats ) दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ रुग्ण दगावले आहेत. तर २० जुलै रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २१ जुलै रोजी एकूण ६२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे १३१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४५७२ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात १५६३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७५ हजार ११८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope ) यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० कोरोना वायरसने (Coronavirus pandemic) बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा