Advertisement

ओमिक्रॉन कोरोनाची नैसर्गिक व्हॅक्सीन, वैज्ञानिकांचा दावा

ओमिक्रॉन कोरोनाची नैसर्गिक व्हॅक्सीन आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

ओमिक्रॉन कोरोनाची नैसर्गिक व्हॅक्सीन, वैज्ञानिकांचा दावा
SHARES

ओमिक्रॉन कोरोनाची नैसर्गिक व्हॅक्सीन आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. त्यांच्यानुसार वेळेसोबतच व्हायरस कमकुवत झाला आहे.

वैज्ञानिक अशाच प्रकारच्या व्हायरसचा वापर करुन लसीची निर्मिती करतात. यामध्ये व्हायरसचे कमकुवत रुप लोकांमध्ये इंजेक्ट केले जाते, त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात.

देशातील ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, भारतातील टॉप आरोग्य तज्ञांनी म्हटलं आहे की, नवीन व्हेरिएंट कोरोनासाठी नैसर्गिक लसीसारखे काम करतो. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असतात किंवा कोणतीही लक्षणे नसतात. जेव्हा ओमिक्रॉनचा संसर्ग होतो तेव्हा लोक गंभीरपणे आजारी पडत नाहीत आणि शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.

अभ्यासानुसार ओमिक्रॉनचे अनेक म्यूटेशन मानवी शरीरासाठी चांगले आहेत. आपण जेवढे जास्त व्हायरसशी लढू, आपले इम्यून सिस्टम कोरोनाविरोधात तेवढे मजबूत होईल. ओमायक्रॉन सध्याच्या काळात कोरोनासाठी उपलब्ध असलेली प्रभावी व्हॅक्सीन आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

वैज्ञानाकांनुसार परिस्थिती कशीही असली तरी आपण कोरोना प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. कारण रुग्णांची संख्या वाढल्यास देशातील आरोग्य सुविधा पुन्हा संकटात सापडतील.

नवा ऑमिक्रॉन व्हेरिएंट कमी लक्षणांसह जास्त लोकांना संक्रमित करेल. ज्यामुळे लोकसंख्येचा एक मोठा भाग विषाणूविरोधात इम्यून होईल, असा दावा अभ्यासात केला आहे.हेही वाचा

विमानतळावर 'या' देशातून येणाऱ्यांनीच RT-PCR प्री-बुक करावी

...नाहीतर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद, वर्षा गायकवाड यांचा इशारा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा