Advertisement

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी दीड लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी

मुंबईत कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी दीड लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी
SHARES

मुंबईत कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. लस घेण्यासाठी आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

दुसऱ्या टप्प्यात पालिकेचे सर्व कर्मचारी आणि पोलीस यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण सध्या सुरू आहे. पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी पुढील मात्रा देण्यात येणार आहे. पालिकेने लसीकरणाऱ्या पुढील टप्प्यांची तयारी सुरू केली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी  पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची माहिती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत. आतापर्यंत दीड लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी झाली असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेचे ७५ दवाखाने लसीकरण केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार आहेत. 

मुंबईतील ५२५१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. या पहिल्या टप्प्याची नोंदणी अजूनही सुरू असून गेल्या काही दिवसांत आणखी २० हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा