Advertisement

धारावीत मंगळवारी अवघ्या एका रुग्णाची नोंद

राज्यात सुरूवातीपासून मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत होते. तर धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता.

धारावीत मंगळवारी अवघ्या एका रुग्णाची नोंद
SHARES

राज्यात सुरूवातीपासून मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत होते. तर धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. येथे रोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत होते. त्यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर धारावीतील कोरोना नियंत्रणात आला.

मंगळवारी धारावीत कोरोनाचा अवघा एकच रुग्ण आढळला आहे. धारावीत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्याचं आता दिसून येत आहे.  मुंबईतील रुग्णसंख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ५३५ नवीन रुग्ण आढळले. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. १०५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईतील रुग्णसंख्येचा दर ०.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २३३ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या १६,३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धारावीत कोरोनाला थोपवणं हे पालिकेपुढे मोठे आव्हान होतं. याठिकाणी सात लाख लोकसंख्या आहे. आहे.

दाट घनता असलेल्या भागात पालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. धारावीत आतापर्यंत ३८०६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील ३२३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या धारावीत केवळ ५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.



हेही  वाचा-

कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार

मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे- मुंबई पोलिस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा