Advertisement

महापालिकेच्या 'या' रुग्णालयाला १६ रुपयांनी कांदे

रुग्णांना पथ्याहारासाठी कंत्राटदारानं हा महागडा कांदा फक्त १६.२९ रुपये प्रतिकिलो भावानं पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.

महापालिकेच्या 'या' रुग्णालयाला १६ रुपयांनी कांदे
SHARES

अवकाळी पावसामुळं कांद्याच्या पिकांचं नुकसानं झालं. परिणामी कांद्याच्या किंमतीत तिपट्टीनं वाढ झाली. कांद्याच्या सततच्या या वाढत्या भावानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते आहे. हॉटेल व रेस्तरॉमध्ये कांदे देण्यास मनाई केली आहे. त्यामुळं कांद्याच्या वाढत्या भावाचा फटका हॉटेल व रेस्तरॉ चालक-मालकालाही बसल्याचं दिसून आलं आहे. अशातच मुंबईतील महापालिकेच्या सायन रुग्णालयाला कांदे स्वस्त दरात मिळत आहेत. सायन रुग्णालयातील रुग्णांना पथ्याहारासाठी कंत्राटदारानं हा महागडा कांदा फक्त १६.२९ रुपये प्रतिकिलो भावानं पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. ३५ हजार किलो कांदे हा कंत्राटदार पुरवणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

हजारो किलोचा पुरवठा

महापालिकेनं सायन रुग्णालयातील आंतररुग्णांना पुढील वर्षभरासाठी पथ्याहार म्हणजे फळे आणि भाजीपाला यांचा हजारो किलोचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यास २ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मे. ए. ए. एम. चेरुवत्तम आणि मे. तेजसन्स फूड्स प्रा. लि. यांनी काही ठरावीक बाबींचे भाव थोडेसे जास्त भरले. सध्या कांद्याचा बाजारभाव हा १०० ते १२० रुपये किलो इतका असताना मे. तेजसन्स फूड्स या कंत्राटदाराने १ किलो कांदा फक्त १६.२९ रुपये भावानं पुरवठा करणार असल्याचं निविदेत स्पष्ट केलं आहे.

कांद्याचा पुरवठा

३ जानेवारी २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत तब्बल ३५ हजार किलो कांद्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी कंत्राटदारानं घेतली आहे. मात्र, स्वस्त भावातील हा कांदा वेळेत पुरवला गेला नाहीतर त्याचा परिणाम रुग्णांच्या पथ्याहारावर होण्याची शक्यता असल्यानं कंत्राटदाराच्या कांद्याचा दर्जा तपासणं खूपच महत्त्वाचं असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कांद्याचा भाव मागील २ महिन्यांपासून कडाडला आहे. भाव वाढण्याच्या आसपासच भाजीपाला व फळभाज्याखरेदीच्या निविदा निघाल्या आहेत.

वाढत्या भावाची माहिती

कंत्राटदारांना वाढत्या भावाची माहिती असणार, हे अपेक्षित धरूनच त्यांनी निविदा भरल्या असाव्यात. प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला येईल, तोपर्यंत कदाचित वाढत्या भावाची माहिती प्रशासनाला देण्याचा अंदाज आहे. अन्यथा कंत्राटदाराला हा भाव परवडत, असे गृहीत धरून प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय स्थायी समिती घेऊ शकते, अशी माहिती मळते.

बाजारभाव कंत्राटदाराचा भाव (रु.)

  • वांगी ४० ७. ४५
  • कोबी ४० ९.१०
  • बटाटे ३० १५.५०
  • सिमला मिर्ची ६० १६.९०
  • फ्लॉवर ६० १४.४९
  • भेंडी ६० १७.९१



हेही वाचा -

गडकिल्ल्यांवर थर्टी फर्स्ट पार्टीला बंदी, ग्रामस्थांचा निर्णय

शिवसेना उपविभागप्रमुखांवर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा