Advertisement

महाराष्ट्रात १ लाखांहून अधिकजण क्वारंटाईनमध्ये

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक लोकांना क्वारंटाईन (home quraintine) करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात १ लाखांहून अधिकजण क्वारंटाईनमध्ये
SHARES

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक लोकांना क्वारंटाईन (home quarantine) करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

दरम्यान राज्यात राज्यात गुरूवारी ७७८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या आता ६४२७ अशी झाली आहे. यापैकी ८४० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आलं आहे.

निम्मे रुग्ण मुंबईतले

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवार २२ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात १.०९ लाख लोकांना आपापल्या घरांतच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर ८ हजार ०५१ लोकांना इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (institutional quarantine) करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यातील निम्मे लोकं हे एकट्या मुंबईतील आहेत.  

लक्ष ठेवणं सोपं

आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या अलगीकरणासाठी तसंच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी होम क्वारंटाईन आणि इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अशा दोन पद्धती वापरण्यात येत आहेत. यापैकी इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये एकाच ठिकाणी संशयित असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणं, इतर उपाययोजना करणं सोपं जातं. याउलट होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांवर वैयक्तिदृष्ट्या लक्ष ठेवता येत नाही. खासकरून धारावीसारख्या हायरिस्क झोनमध्ये असलेली लोकं एकमेकांच्या संपर्कात आल्यास धोका वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.    

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन

तर, मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल. 

कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे, चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केलं जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर ७ दिवसांवर गेलाय. त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा