Advertisement

पालघरमधील पहिले बाल कोविड रुग्णालय उसगावमध्ये सुरू

या बाल कोरोना रुग्णालयात एकूण १० बेड्स असून त्यापैकी ८ ऑक्सिजन बेड्स आणि २ व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत.

पालघरमधील पहिले बाल कोविड रुग्णालय उसगावमध्ये सुरू
SHARES

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लहान मुलांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक प्रशासनांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पालघर जिल्ह्यातील उसगाव डोंगरी येथे बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहं. श्रमजीवी संघटनेच्या विधायक संसद या उपक्रमातून हे रुग्णालय सुरू झालं आहे. 

लहान मुलांसाठीच्या या कोविड रुग्णालयाचं आणि या भागातील ग्रामीण आदिवासी रुग्णांना कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० बेड्सच्या रुग्णालयाचं नुकतंच नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, स्थानिक खासदार डॉ. राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा तसेच कोविड केंद्रात उपचार करणारे डॉ. वर्षा आणि डॉ. राजेश भोसले आदी उपस्थित होते.  

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या  बाल कोरोना रुग्णालयाला २ व्हेंटिलेटर्सची भेट देत असल्याची घोषणा यावेळी केली. या बाल कोरोना रुग्णालयात एकूण १० बेड्स असून त्यापैकी ८ ऑक्सिजन बेड्स आणि २ व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण आधीपासूनच सज्ज रहायला हवे, असं मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. 

 कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यानंतर बेडची कमतरता, रेमडेसीवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता इत्यादी गोष्टीची कमतरता सर्वत्र भासू लागली. परंतु, पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता काही समाजसेवी संस्था आणि संघटना मदतीसाठी पुढे आल्या आणि त्यांनी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. सध्या कोरोनाचे संकट ओसरत आहे असे वाटत असतानाच म्युकरमायकोसिस सारखे नवीन आजार उद्भवू लागले आहेत. या आजारांना तोंड द्यायचे असेल तर आपल्याला आतापासून तयारी करून ठेवणे आवश्यक असल्याचे  शिंदे यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा -

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

  1. १५ जूनपर्यंत मासेमारीला परवानगी देण्याची मच्छिमारांची मागणी
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा