Advertisement

वाडिया रुग्णालयात गॅस फुग्यांचा स्फोट


SHARES

परळ - वाडिया रुग्णालयात शुक्रवारी डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण, कार्यक्रमात मनोरंजनासाठी लावण्यात आलेल्या गॅस फुग्यांमध्ये फटाक्यांची ठिणगी उडाल्याने स्फोट झाला. स्फोटात चार कर्मचारी जखमी झाले.

वाडिया रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात गॅस फुगे आणि फटाके ही आणण्यात आले होते. दरम्यान, फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे एक ठिणगी फुग्यांमध्ये पडून स्फोट झाला. यात, व्यावसायिक थेरपीतील कर्मचारी हर्षदा साठम, निशा कांबळे आणि निवेदिता गायकवाड या तिघी किरकोळ जखमी झाल्या असून कर्मचारी सादिक अन्सारी 40 टक्के भाजले आहेत. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर, डॉ. मिनी बोधनवाला आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी जोगदे- पांढरे यांनी या घटनेबाबत माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा