Advertisement

मुंबईत १ वर्षांखालील बालकांना देणार पीसीव्ही लस

पालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने आणि रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे.

मुंबईत १ वर्षांखालील बालकांना देणार पीसीव्ही लस
SHARES

मुंबई महापालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन’ (pneumococal conjugate vaccine / pcv) देण्‍यात येणार आहे. पालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने आणि रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे. 

मुंबईत 1 वर्षांखालील बालकांची संख्‍या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना ही लस दिली जाणार आहे. पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येत असुन क्षेत्रीय स्‍तरावर जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस आणि इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार, बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरु करण्‍यात येईल, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा व्हायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, सदर लसीकरण मोहिमेत आता आणखी एका नवीन लसीचा अंर्तभाव करण्‍यात आला आहे. या लसीचे नाव ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन’ (pcv) असे असुन या लसीमुळे न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर  न्युमोकोकल आजारापासून संरक्षण मिळू शकणार आहे.

भारतात 2010 मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षांखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात 5 ते 6 लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो हा आजार म्‍हणजे फुफुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व  खोकलाही येतो तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. 2 प्रायमरी डोस वयाच्या 6 आठवड्यात, 14 आठवड्यात आणि 1 बूस्टर डोस वयाच्या 9 व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्‍या मांडीवर स्‍नायुमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या 1 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसी सोबत देण्यात येईल.



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा