Advertisement

महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार, कोविडच्या तिसऱ्या लाटेची तयारी

कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार, कोविडच्या तिसऱ्या लाटेची तयारी
SHARES

कोरोना संसर्गाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लहान मुलांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये १३ तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचं मुख्यत्वेकरून काम करेल.

टास्क फोर्समधील बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेड्स यांची तयारी करण्यात येईल.आवश्यकता भासल्यास टास्क फोर्समधील तज्ज्ञ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील विविध बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शनही करतील.

तिसऱ्या लाटेची शक्यता

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत चर्चाही केली केली होती.

हेही वाचा- नवी मुंबईत दिव्यांगांचं रांग न लावता होणार लसीकरण

‘या’ तज्ज्ञांचा समावेश

लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं.

या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे.

(pediatric taskforce ready for children in maharashtra for third wave of covid 19)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा