Advertisement

परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरी लस २८ दिवसानंतर घेण्यास परवानगी

कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा १२ ते १६ आठवडय़ानंतर म्हणजे ८४ दिवसांनतर घेण्याची अट आहे. मात्र, परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्याने प्रवास करताना अडचणी येत होत्या.

परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरी लस २८ दिवसानंतर घेण्यास परवानगी
SHARES

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना आणि टोकियोमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा २८ दिवसानंतर आणि ८४ दिवसांच्या आत घेण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. 

याबाबतची कार्यपद्धतीही जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लशीचे प्रमाणपत्र पासपोर्टशी लिंक केले जाणार आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा १२ ते १६ आठवडय़ानंतर म्हणजे ८४ दिवसांनतर घेण्याची अट आहे. मात्र, परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्याने प्रवास करताना अडचणी येत होत्या.  मात्र दुसरी मात्रा ८४ दिवसांनंतर घ्यायची झाल्यास अनेकांची परदेशात पोहोचण्याची तारीख उलटून जात होती. यामुळे ८४ दिवसांची अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशी शिकण्यासाठी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्यांना दुसऱ्या मात्रेसाठी २८ दिवसांनंतर पात्र ठरविलं आहे. यामध्ये टोकियो येथे ऑलिम्पिकसाठी जाणारे स्पर्धक, खेळाडू यांचाही समावेश करण्यात आला आहे.

कोविन अ‍ॅपमध्ये या व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी या गटातील व्यक्तींना संबंधित कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या व्यक्तींच्या लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून पारपत्राची नोंदणी करणं आवश्यक आहे. या लशीचे प्रमाणपत्र पासपोर्टशी लिंक करण्यात येणार आहे. ही सुविधा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत लागू असेल असेही नमूद करण्यात आले आहे.



हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा