लवकरच ब्लडबँकेतही फार्मासिस्ट बंधनकारक

  Pali Hill
  लवकरच ब्लडबँकेतही फार्मासिस्ट बंधनकारक
  मुंबई  -  

  मुंबई - सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कन्ट्रोल आँर्गनायझेशननं ब्लडबँकेत फार्मासिस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय. रुग्णालय आणि औषध दुकानांत फार्मासिस्ट असतोच. पण जिथं औषधांचं वितरण होतं त्या ब्लडबँकेत मात्र फार्मासिस्ट नसतो. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. तशा काही घटनाही समोर आल्यात. त्यामुळे ब्लडबँकेतही आता फार्मासिस्ट अनिवार्य असेल. त्यानुसारच ब्लडबँक सुरू करण्यासाठी परवाना देण्यात येईल. सुरू असलेल्या ब्लडबँकेत फार्मासिस्ट नसेल, तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.

  यासंबंधीचा अभ्यास सध्या सुरू असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली फार्मासिस्ट संघटनेचे अध्यक्ष विनयकुमार भारती यांनी मुंबई लाइव्हला दिली. या प्रस्तावानुसार नॅशनल एड्स कन्ट्रोल ऑर्गनायझेशन आणि त्या-त्या राज्यांतल्या एफडीएवर ब्लडबँकेत फार्मासिस्ट आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी असेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.