Advertisement

झेन हॉस्पिटलमध्ये ब्रॉन्कोस्कोपने छातीतून काढली पिन

२१ नोव्हेंबर रोजी इनाया गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेली असता स्कार्फ परिधान करत असताना अनावधानानं तिनं तोंडात धरलेली पिन गिळली. त्यानंतर तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. पिन नक्की कुठं अडकली याचा शोध घेण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला.

झेन हॉस्पिटलमध्ये ब्रॉन्कोस्कोपने छातीतून काढली पिन
SHARES

चेंबूर मधील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका १८ वर्षीय तरूणीच्या फुफ्फुसात ६ दिवस अडकलेली ३.५ सेंटीमीटरची पिन आधुनिक ब्रॉन्कोस्कोपच्या मदतीनं बाहेर काढली आहे. इनाया शेख (नाव बदलेलं आहे) असं या तरूणीला २७ नोव्हेंबर रोजी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 


प्रयत्न अयशस्वी

२१ नोव्हेंबर रोजी इनाया गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेली असता स्कार्फ परिधान करत असताना अनावधानानं तिनं तोंडात धरलेली पिन गिळली. त्यानंतर तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. पिन नक्की कुठं अडकली याचा शोध घेण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला. पिन कोणत्या ठिकाणी आहे हे समजल्यानंतर लगेचच एण्डोस्कोपीद्वारे ती पिन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. 


शस्त्रक्रियेचा सल्ला

त्यानंतर तिला लगेचच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्या ठिकाणीही पिन काढण्यातही यश मिळालं नाही. इनायाच्या फुफ्फुसात अडकलेली पिन एण्डोस्कोपीद्वारे काढण्यासाठी ३ वैद्यकीय महाविद्यालयं आणि २ हॉस्पिटलला अपयश आल्यानंतर तिला एका डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हे पिन काढण्याचा सल्ला दिला. मात्र तो न मानता कुटुंबियांनी मुंबईतील झेन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार घेण्याचा निर्णय घेतला. 


धारदार पिन 

झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काढलेल्या एक्स रे मध्ये तिच्या फुफ्फुसात अडकलेली पिन धारदार आणि अणकुचीदार असल्याचं दिसून अालं. विशेष म्हणजे सहा दिवसांपासून तिच्या शरीरात ती पिन असल्यानं तिला संसर्ग होण्याचा व तिच्या हृदय व फुफ्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होण्याचा धोका होता. त्यामुळं फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्रॉन्कोस्कोपने ती बाहेर काढण्यात आल्याचं फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितलं. आमच्या रुग्णालयातील कुशल डॉक्टरांची टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशी गुंतागुंतीची प्रकरणं नेहमीच हाताळली जातात. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी आमची कोड ब्ल्यू टीम नेहमी सज्ज असते. अशा प्रकरणांमध्ये दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते, म्हणूनच पुढील नुकसान टाळण्यासाठी तातडीनं वैद्यकीय मदत घ्यावी. 

- डॉ. रॉय पाटणकर,  संचालक, झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलहेही वाचा -

मुंबईत एचअायव्हीचं प्रमाण ५६ टक्क्यानं घटलं

मुंबईत दर दिवशी ३ नागरिकांना डेंग्यूची लागण
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा