Advertisement

पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण: डॉक्टरांच्या संपाचा आठवा दिवस


पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण: डॉक्टरांच्या संपाचा आठवा दिवस
SHARES

वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयातील डाॅक्टरांच्या काम बंद आंदोलनाला सोमवारी आठ दिवस पूर्ण झाले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय, मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रालयात जाऊन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना रूग्णालय प्रशासनाने फी भरुनही वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी गेल्या सोमवारपासून म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरूवात केली.



पुन्हा होणार बैठक

सोमवारी आंदोलनाचा ८ वा दिवस आहे. तरीही आमच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता वरळीचे आमदार सुनिल शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तर आंदोलन आणखी तीव्र करून विद्यार्थी उपोषणाला बसतील, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींकडून देण्यात आला आहे.



विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

  • विद्यार्थ्यांना वसतिगृहात व्यवस्थित सोयी-सुविधा मिळाव्यात.
  • प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना वसतिगृहात राहण्याची मुभा द्यावी.
  • विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केल्यामुळे डॉ.गोविंद खटी यांची अधिष्ठाता पदावरून हाकालपट्टी करावी.



हेही वाचा-

पोद्दार काॅलेज प्रकरण: 'भरलेलं शुल्क परत करू‘, पण विद्यार्थ्यांच्या राहण्याचं काय?

पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण : डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा