Advertisement

पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण : डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच


पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण : डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच
SHARES

वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयातील डाॅक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा गुरुवारी चौथा दिवस. या रुग्णालय प्रशासनाने प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे येथील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी वरळीचे आमदार सुनिल शिंदे यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची बुधवारी मंत्रालयात भेट घेतली. तर गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत अधिष्ठाता डाॅ. गोविंद खटी आणि विद्यार्थी यांच्यात बैठक झाली. दरम्यान या बैठकीतून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितलं.  


अन्यथा संप सुरू राहणार

येत्या सोमवारी रुग्णालयाचे सचिव यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. गुरुवारी विद्यार्थी प्रतिनिधी विधानभवनात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन भेटण्यासाठी गेले होते. पण अजूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?

महाविद्यालय प्रशासनाने प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला. हा निर्णय भटक्या जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांनादेखील लागू करण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयाच्या वसतिगृहात सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर यांसारख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरतेवेळी स्टॅम्प पेपरवर पुढील वर्षापासून वसतिगृहात राहता येणार नाही, अशी सक्ती करण्यात आली आहे. शिवाय, असं न केल्यास परीक्षा अर्ज न देण्याचे आदेश दिले आहेत.

यावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाद मागितली असता, हा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करावा असे निवेदन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलं.


हेही वाचा - 

पोद्दार काॅलेज प्रकरण: 'भरलेलं शुल्क परत करू‘, पण विद्यार्थ्यांच्या राहण्याचं काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा