Advertisement

खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक

मुंबईतील खासगी डॉक्टरांना आता सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक
SHARES

मुंबईतील खासगी डॉक्टरांना आता सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वैद्यकीय शिक्षण-संशोधन मंडळाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी तसा आदेश काढला आहे. याला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या खासगी डॉक्टरांना या आदेशातून मात्र सूट देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आणि महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. मुंबई महापालिकेने वारंवार आवाहन करुन तसंच परवाना रद्द करण्याचा इशारा देऊनही अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, नर्सिंग होम सुरु केलेले नाहीत. त्यामुळे आता सरकारने मान्यताप्राप्त आणि पदवीधर डॉक्टरांनी कोरोनाचे रुग्ण असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढले आहेत.

वैद्यकीय शिक्षण संशोधन मंडळाने जारी केलेल्या पत्रकात डॉ. तात्याराव लहाने यांनी खासगी डॉक्टरांना आवाहन केलं आहे की, कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी किमान 15 दिवस तुमची सेवा द्या. तुम्हाला ज्या ऐच्छिक परिसरात सेवा द्यायची आहे त्याची माहिती महापालिकेचे अधिकारी मिलिंद कांबळे यांना द्या. तसंच या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असंही तात्याराव लहानेंनी म्हटलं आहे. मुंबईत अॅलोपॅथीचे अंदाजे 30 हजार डॉक्टर आहेत, त्यापैकी 13 हजार डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत.हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा