Advertisement

उंदरानं डोळे कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप, राजावाडीतील घटना

मुंबईतील प्रसिद्ध राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi Hospital Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उंदरानं डोळे कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप, राजावाडीतील घटना
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi Hospital Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप (Allegation of rat nibble eyes of patient) त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हा प्रकार घडला असल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदरानं कुरतडल्याचा आरोप आहे. श्रीनिवास यल्लपा असं या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं.

मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं तपासणीत समोर आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. डोळे तपासले असता डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं. रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितलं असता त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.हेही वाचा

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; 'अशी' आहे तयारी

बनावट लसीकरणातील आरोपी डाॅक्टर फरार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा