Advertisement

नातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती

रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाईन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही.

नातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती
SHARES

आयसीयूमधील कोरोना रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळत नसल्याने ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना रोज दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. सईदा खान यांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. ही मागणी पालिकेने मान्य केल्याने आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळणार आहे.

मुंबईत सुमारे 30 हजार 359 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 8074 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यास त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांकडे मोबाईल असल्याने त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत असते.

रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाईन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. रुग्ण बरा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तरच त्याची माहिती रुग्णालयातून दिली जाते. परंतु आयसीयूमधील रुग्णांच्या प्रकृतीची माहिती रोज त्यांच्या नातेवाईकांना वॉर्डमधील मुख्य नर्सकडून दिली जावी,  अशी मागणी डॉ. खान यांनी पालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. कोरोना रुग्णांचे अपडेट वेळोवेळी देत असतो. यापुढे आयसीयूमधील रुग्णांची माहिती संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना दिली जाईल,  असे उपायुक्त रमेश पवार यांनी सांगितले.


हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा