Advertisement

१५ दिवसांत २००२ प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवले

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही तब्बल १५७ दिवसांवर गेला आहे. इमारतींमध्ये वाढणारा कोरोनाचा धोकाही कमी होत चालला आहे.

१५ दिवसांत २००२ प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवले
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही तब्बल १५७ दिवसांवर गेला आहे.  इमारतींमध्ये वाढणारा कोरोनाचा धोकाही कमी होत चालला आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांत मुंबई महापालिकेने २००२ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवले आहेत.

रुग्ण आढळणाऱ्या इमारती, चाळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिकेकडून जाहीर केली जातात. दहापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाते. पालिकेने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुंबईतील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्याचं दिसून आलं. घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, जनजागृती आणि प्रभावी उपाययोजनांमुळे इमारतींमधील रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे सील केलेल्या इमारतींची संख्याही कमी झाली आहे.


मुंबईत १५ ऑक्टोबर रोजी ९ हजार ४५९ सील इमारती होत्या. तर झोपडपट्ट्या, चाळींमध्ये ६३२ प्रतिबंधित क्षेत्रे होती. यामध्ये घट होऊन २३ ऑक्टोबर रोजी सील इमारतींची संख्या ८५१८ तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ६२० पर्यंत खाली आली. ३० ऑक्टोबर रोजी सील इमारतींची संख्या ७४५७ तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ६०९ पर्यंत खाली आली आहे.

पालिकेन रोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आधी रोज सात हजार चाचण्या होत होत्या. आता १५ ते १८ हजार चाचण्या रोज केल्या जात आहेत. ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईत एकूण चाचण्यांची संख्या १५ लाख १३ हजार १५४ झाली आहे.


हेही वाचा -

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा