नायर रुग्णालयात कोरोनाबाधित 302 गरोदर महिलांची सुखरुप प्रसुती झाली आहे. तसंच एक तिळे आणि जुळ्या बालकांसह 307 बालकांनी कोरोनावर मात केली आहे. नायर रुग्णालयात 14 एप्रिल रोजी पहिल्या कोरोना बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती.
मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांच्या सुयोग्य समन्वयातून ३०२ कोरोनाबाधित महिलांचे बाळंतपण सुखरुप झाले आहे. ज्यापैकी 11 बालकं कोरोनाबाधित होते. परंतु उपचारानंतर हे सर्व बालकं कोरोनामुक्त झाली आहेत.गेले दोन महिने सातत्याने मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्यांमध्ये प्रसूतिशात्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे 75 वैद्यकीय कर्मचार्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सीमा चव्हाण, रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे 75 वैद्यकीय कर्मचार्यांचा समावेश असून या सर्वांच्या कामगिरी कौतुक केले जात आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांनीही तिन्ही विभागातील सर्व कर्मचार्यांना शुभेच्छा देत त्यांच्या अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
नायर रुग्णालयातील प्रसूतिशात्र, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा, भूलशात्र विभागांतील डॉक्टर, नर्स, वार्डबॉय आदींनी घेतलेले अथक परिश्रम कारणीभूत आहेत. हे त्यांचेच यश आहे. यासंदर्भातील माहिती, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशात्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशात्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे.
सायन व केईएम रुग्णालयातही कोरोना बाधित गरोदर महिलांचे बाळंतपण सुखरुप झाले आहे. केईएम रूग्णालयात 103 नवजात बालकांनी तर सायन रुग्णालयात 100 हुन अधिक नवजात बालकांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा -
दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात
सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह