Advertisement

प्रतिक्षानगर येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर


प्रतिक्षानगर येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर
SHARES

प्रतिक्षानगर - मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रतिक्षानगरमध्ये करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सुजोक असोसिएशन यांच्या वतीने 15 मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने वॉर्ड क्र. 175 चे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी हे शिबीर आयोजित केले. कुठल्याही गोळ्या किंवा औषध न देता नैसर्गिक पद्धतीने आजारांवर मात करणारी म्हणजेच सुजोक ही उपचार पद्धत या शिबिरात वापरली जात आहे. 

अचानक उद्भवणारे आजार, गंभीर आणि दीर्घकालीन आजार, लहान मुलांचे आजार, मानसिक आजार, सांधे दुःखी आणि श्वसन विकार इत्यादी सर्व पद्धतीच्या आजरांवर मात करणारी कोरियन थेरपी येथे केली जात आहे. तर या शिबिरात आतापर्यंत 300 हून अधिक विभागातील नागरिकांनी उपस्थिती लावत डॉक्टरांना त्यांचे आजार सांगितले.

या शिबिरात एकूण 50 डॉक्टर त्याचबरोबर कामा रुग्णालयातील 20 परिचारीका देखील सहभागी झाल्या. हे शिबीर15 आणि 16 असे दोन दिवस सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुजोकचे जनक प्रोफेसर पार्क जे. वू., आंतरराष्ट्रीय सुजोक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पार्क मिनच्युल यांनी तिथे आलेल्या नागरिकांना तपासले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा