Advertisement

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच

राज्यासह मुंबईतील सरकारी रुग्णालयाती प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विद्यावेतनाच्या मागणीसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईसह अन्य जिल्ह्यात या संपाचे पडसाद बुधवारपासून दिसत आहे. यासाठी प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांकडून प्रशासनाला लेखी पत्र पाठवलं खरं, मात्र यावर काहीच उत्तर न आल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारपासून संप पुकारला आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
SHARES

राज्यासह मुंबईतील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विद्यावेतनाच्या मागणीसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईसह राज्यात  संपाचे पडसाद बुधवारपासून दिसत आहे. यासाठी प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांकडून प्रशासनाला लेखी पत्र पाठवलं खरं, मात्र यावर काहीच उत्तर न आल्यानं विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे.


संपाचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणांतर्गत एक वर्षाची इंटर्नशीप करणं विद्यार्थ्यांना आवश्यक असतं. अर्थात ही इंटर्नशीप "पेड इंटर्नशीप" असते. यामध्ये महाराष्ट्र सोडून इतर राज्यात ११ हजारपेक्षा जास्त वेतन दिलं जातं. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला कमी वेतन मिळत असून विद्यावेतन किमान १८ ते २० हजार इतकं असावं, या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी अर्जरूपी याचिका आरोग्यमंत्र्यांना दिली. मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं महाराष्ट्रातून जवळपास २७०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.


प्रशासनाचं दुर्लक्ष 

वेतनवाढीसाठी याआधी देखील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाने २६ एप्रिल रोजी जाहीर निदर्शनं केली होती. मात्र त्यानंतरही सरकारनं कोणतीही पावलं न उचल्यानं १२ जूनला प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि प्रशासकीय मंडळाची बैठक झाली.पण ही बैठक निष्फळ ठरली नि प्रशिक्षणार्थी डॉक्टर १३ जून पासून अवैध काळासाठी संपावर गेले असून संपाच्या दुसर्या दिवशीही प्रशिक्षणार्थी आक्रमक असल्याचं चित्र आहे. 

१२ जून रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संघटना आणि प्रशासनाची बैठक झाली. पण त्यामध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने इंटर्न डॉक्टरांनी संप सुरू केला. आपल्या मागण्या जोवर मान्य होत नाहीत आणि मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन असंच सुरूच राहिल. 
- डॉ. गोकुळ राख, सचिव, प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटना


हेही वाचा -

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं 'कामबंद आंदोलन' सुरु!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा