Advertisement

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं 'कामबंद आंदोलन' सुरु!

मेडिकल इंटर्नशीपमध्ये विद्यावेतन म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ व्हावी प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांकडून प्रशासनाला लेखी पत्र पाठवलं होतं. पण त्यावर काहीच उत्तर न आल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं 'कामबंद आंदोलन' सुरु!
SHARES

मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालय आणि सरकारी डेंटल हॉस्पिटलमधील ६०० हून अधिक प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्स विद्यावेतनाच्या मागणीसाठी संपावर गेले आहे. यामध्ये मुंबईसह ठाण्यातील सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे.

मेडिकल इंटर्नशीपमध्ये विद्यावेतन म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ व्हावी प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांकडून प्रशासनाला लेखी पत्र पाठवलं होतं. पण त्यावर काहीच उत्तर न आल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

काय आहे कारण?

महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणांतर्गत एक वर्षाची इंटर्नशीप करणं विद्यार्थ्यांना आवश्यक असतं. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला कमी वेतन मिळत असून विद्यावेतन किमान १८ ते २० हजार इतकं असावं, या मागणीससाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी अर्जरूपी याचिका आरोग्यमंत्र्यांना दिली. पण त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळालं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास २७०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.

कामबंद आंदोलन

१२ जून रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संघटना आणि प्रशासनाची बैठक झाली होती. पण त्यामध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने इंटर्न डॉक्टरांनी संप सुरु केला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे हे कामबंद आंदोलन आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि त्याची ग्वाही लिखित स्वरूपात मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे,
- डॉ. गोकुळ राख, सेक्रेटरी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संघटनाहेही वाचा-

ट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये नाही एनआयसीयू विभाग, बालकं दगावण्याच्या घटना वाढल्याRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा