महापालिका रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात

  Mumbai
  महापालिका रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या प्रकारानंतर रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये शनिवारी 400 सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असून, या सर्व जवानांच्या कडक तपासणीतूनच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची वाट मोकळी करून दिली जाणार आहे.

  महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळांच्या मागणीनुसार महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या सुचनेनंतर महापालिकेच्या केईएम, शीव, नायर यासह कुपर रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था राबवण्यता आली आहे. यासर्व रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या वतीने 400 जवान शनिवारी सेवेत रुजू झाले आहेत. एकटया केईएम रुग्णालयातच 70 जवान तैनात करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 400 आणि 1 मे नंतर 300 सुरक्षारक्षक पुरवले जाणार आहेत. एक वर्षासाठी ही सुरक्षा रक्षक सेवा घेण्यात आली आहे.

  हे सुरक्षा रक्षक तैनात करतानाच रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दोनच जणांना प्रवेश देण्याचे निर्बंध घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ दोनच नातेवाईकांना पास दिले जाणार आहेत. अलार्म सिस्टीम बसवण्याचे काम प्रगतीप्रथावर असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.