Advertisement

कोरोना लसीवरील क्लिनिकल चाचणीसाठी सायन रुग्णालय मंजुरीच्या प्रतिक्षेत

कोयनॅक्सिन या पहिल्या स्वदेशी लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करण्यासाठी नीतिशास्त्र समितीच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

कोरोना लसीवरील क्लिनिकल चाचणीसाठी सायन रुग्णालय मंजुरीच्या प्रतिक्षेत
SHARES

मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका म्हणजेच सायन रुग्णालयाला कोरोनावर देण्यात येणाऱ्या कोयनॅक्सिन या पहिल्या स्वदेशी लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करण्यासाठी नीतिशास्त्र समितीच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) हैदराबादची कंपनी भारत बायोटेक उत्पादित कोवाक्सिनच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी सायन रुग्णालयाची निवड केली होती. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाच्या नीतिशास्त्र समितीसमोर यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

अहवालानुसार १८ ते ६० वयोगटातील किमान १००० स्वयंसेवक या चाचणीचा भाग असणार आहेत. त्यापैकी २० टक्के लोक अल्पसंख्याक असणार आहेत. तर सहभागींपैकी ५ टक्के लोक आरोग्य कर्मचारी असतील. आयसीएमआरनं मांडलेल्या नियमांनुसार रुग्णालय स्वयंसेवकांच्या आरोग्यासाठी १२ महिने पाठपुरावा करेल.

कोव्हॅक्सिनच्या टप्प्यातील ३ क्लिनिकल चाचण्यांमध्ये २२ देशांमधील २६ हजार सहभागी होतील. कोवॅक्सिन ही सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी आहे जी भारतातील कोरोनाव्हायरससाठी घेतली जात आहे. याची नोंद क्लिनिकल ट्रायल्स रेजिस्ट्री ऑफ इंडियामध्ये नोंदवली गेली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीसीजीआय) याला मंजूरी दिली आहे.

यापूर्वी हैदराबादस्थित कंपनीनं घोषणा केली होती की, देशातील विकसित औषधांच्या टप्पा -१ आणि २ मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीआय) हिरवा कंदील दिला. मानवी चाचण्या घेण्यास मान्यता मिळावी म्हणून कंपनीनं पूर्व-क्लिनिकल अभ्यासामधून तयार केलेले निकाल सादर केले होते. या चाचण्या सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रिया दर्शवण्यासाठी आहेत.


हेही वाचा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या

गुगल मॅप्सवर सार्वजनिक ठिकाणावरील कोरोना रुग्णांची माहिती मिळणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा