Advertisement

दहावीतील ऋत्विकचा हार्ट अटॅकने मृत्यू, परीक्षेआधीच काळाने घातला घाला

मुंबईच्या दादर भागातील शिशूविहार शाळेत शिकणारा ऋत्विक आपली आई आणि दोन बहिणींसह प्रभादेवीतील आदर्शनगर परिसरात राहत होता. बुधवारी रात्री अभ्यास करून झोपल्यानंतर ऋत्विक सकाळी उठलाच नाही.

दहावीतील ऋत्विकचा हार्ट अटॅकने मृत्यू, परीक्षेआधीच काळाने घातला घाला
SHARES

वरळीत राहणाऱ्या ऋत्विक घडशी (१५) या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. ऋत्विक गुरुवारी दहावीचा पहिला पेपर देणार होता. पण, त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

गुरुवारी पहाटे त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. १५ वर्षांच्या लहान वयात एखाद्या मुलाला हृदयविकाराचा झटका येणं ही फार दुर्मिळ गोष्ट असल्याचं म्हटलं जात आहे. ऋत्विकच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं अाहे.

मुंबईच्या दादर भागातील शिशूविहार शाळेत शिकणारा ऋत्विक आपली आई आणि दोन बहिणींसह प्रभादेवीतील आदर्शनगर परिसरात राहत होता. बुधवारी रात्री अभ्यास करून झोपल्यानंतर ऋत्विक सकाळी उठलाच नाही. त्याला सकाळी उठवण्याचा बराच प्रयत्न केला. पण तो न उठल्याने त्याला तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्याआगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास ऋत्विकला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं ऋत्विकच्या मामांनी सांगितलं.


ऋत्विकला गुरूवारी पहाटे रुग्णायलात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


मृतदेह कुटुंबियांकडे

आई धुणीभांडी करून ऋत्विकला शाळा शिकवत होती. केईएम रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.


मृत्यूमागे नेमकं कारण काय?

  • लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्याची दोन प्रमुख कारणं असतात. चॅनेलोपॅथी आणि कार्डियोमायोपॅथी.
  • चॅनेलोपॅथी म्हणजे हृदयाचे ठोके नियमित पडण्यासाठी इलेक्ट्रीक करंट असणं गरजेचं असतं. हा करंट कमी जास्त झाला, तर ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
  • तर, कार्डियोमायोपॅथीमध्ये हृदयाचे स्नायू असामान्य होतात परिणामी लहान वयात हृदयाविकाराचा झटका येऊ शकतो.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा