Advertisement

अपुऱ्या सुविधांमुळे शुश्रूषाच्या कर्मचाऱ्यांचे हाल

मुंबईतील दादर परिसरातील शुश्रूषा रुग्णालयात डॉक्टरमुळं ८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

अपुऱ्या सुविधांमुळे शुश्रूषाच्या कर्मचाऱ्यांचे हाल
SHARES

मुंबईतील दादर परिसरातील शुश्रूषा रुग्णालयात डॉक्टरमुळं ८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यानं रुग्णालय बंद करून रुग्णालय प्रशासनानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीनं राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये विलगीकरण करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र, याठिकाणी असलेल्या या कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट असून खाण्यापिण्यासाठी उपलब्धता नसल्यान कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पालिका प्रशासनानं त्यांना रुपारेल महाविद्यालयामध्ये हलवलं.

रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले मात्र, या कर्मचाऱ्यांची चौकशीही फोन करून रुग्णालयातील प्रशासनाने केली नाही, असा आक्षेप कर्मचाऱ्यांसकट पालिका प्रशासनानेही घेतला आहे. ज्या नर्सवर वैद्यकीय उपचार सुरू आहे त्यांची औषधेसुद्धा आणून देण्यात आली. रुग्णालय सुरू होईल या आशेने असलेल्या डायलिसिसच्या रुग्णांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. जोपर्यंत त्यांच्या वैद्यकीय तपासण्या होत नाही तोपर्यंत त्यांनाही डायलिसिस मिळणार नाही. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयामध्ये सुविधा असताना पालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये का ठेवण्यात आले, असाही प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते तसंच, ज्यांना आता लक्षणे दिसतात त्यांच्याच वैद्यकीय तपासण्या करण्यात येतील, असे नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

स्वतःच्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करण्याची तसदी घेण्यात आली नाही. रुपारेलमध्ये पालिकेने त्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, शंभरजणांची वैद्यकीय चाचणी करण्याची जबाबदारी पालिकेची नसून रुग्णालय प्रशासनाची आहे, असंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे. कोरोनासाठी खासगी वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या लॅबनी तपासण्या करून देण्यासाठी मान्यता दिली असली, तरीही त्यांना आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रिस्क्रिप्सशन गरजेचे आहे. अनेक रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर सही, स्टॅम्प तसेच डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबरही नाही. रुग्णालय बंद असल्यामुळे मदत करू शकत नसल्याचे उत्तरही रुग्णांना देण्यात आल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा