Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट 'इथं' सुरू, आता रोबोट करणार शस्त्रक्रिया

प्रोस्टेट, कर्करोग, किडनी, थायरॉइड, गर्भाशयाची पिशवी काढणं यासह अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीनं अचूक करणं शक्य होणार आहे.

पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट 'इथं' सुरू, आता रोबोट करणार शस्त्रक्रिया
SHARES

मराठवाड्यातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट सुरू झालं आहे. २६, २७ जून रोजी पहिली शस्त्रक्रिया होईल. या सुविधेमुळे मराठवाड्यातील रुग्णांना मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही. औरंगाबादमध्ये हे युनिट सुरू करण्यात आलं आहे.

प्रोस्टेट, कर्करोग, किडनी, थायरॉइड, गर्भाशयाची पिशवी काढणे यासह अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीनं अचूक करणं शक्य होणार आहे. यामुळे रुग्णाला कमीत कमी त्रास होईल. त्याचा हॉस्पिटलमधील मुक्कामही कमी होईल, असं सिग्माचे प्रमुख डॉ. उन्मेष टाकळकर यांनी सांगितलं.

पुण्यातील प्रख्यात कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी सिग्माच्या चमूमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पहिल्या शस्त्रक्रिया होतील.

डॉ. टाकळकर यांनीही अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सांगितलं की, सुमारे सात कोटी रुपये खर्चून या युनिटची उभारणी केली आहे. यात डॉक्टरांची कमीत कमी गरज लागेल. मात्र, डॉक्टरांच्या नियंत्रणातच रोबोट शस्त्रक्रिया करेल.

थ्रीडी चष्म्यातून डॉक्टरांना रोबोटच्या कामावर नजर ठेवता येईल. शरीरातील ज्या भागावर रोबोट शस्त्रक्रिया करेल तो भाग डॉक्टरांना अधिक खोलवर पाहणंही शक्य होणार आहे. त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका टळेल. रुग्णाच्या शरीरावर व्रण राहत नाहीत. जखम तुलनेनं वेगात भरून येते. अशा शस्त्रक्रियांचा खर्च अधिक असला तरी त्याचा खूप मोठा भार रुग्णांवर पडू नये, असा आमचा प्रयत्न आहे.

सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे म्हणाले, रोबोटिक शस्त्रक्रियेत अचूकता येते. विशेषत: कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत छोट्याशा छेदातून शरीराच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचता येईल. यामुळे रुग्णांना वेदना कमी होतील. रक्त वाया जाण्याचे प्रमाणही घटेल.हेही वाचा

'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणाला मुंबईत सुरुवात

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा