Advertisement

'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणाला मुंबईत सुरुवात

कोरोनावर ९३ टक्के प्रभावी असलेली स्पुटनिक व्ही लस मुंबईतील नागरिकांना दिली जात आहे.

'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणाला मुंबईत सुरुवात
SHARES

कोरोनावर (coronavirus) ९३ टक्के प्रभावी असलेली स्पुटनिक व्ही लस मुंबईतील नागरिकांना दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पुटनिक व्ही लसीकरणाची सुरूवात मुंबईमध्ये झाली असून ६६७ जणांना स्पुटनिक व्ही लस देण्यात आली आहे. घाटकोपर (ghatkoper) येथील खासगी रुग्णालयामध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लशीमुळे कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांची नोंद झालेली नाही.

मुसळधार पाऊस, पावसामुळं काही ठिकाणी बंद असलेले लसीकरण, अनेक ठिकाणी साचलेले पाणी, अशा अनेक अडथळ्यांवर मात करून मुंबईकरांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. २ दिवसांपूर्वी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झाले होते. बुधवारी पाऊस असतानाही मुंबईत पन्नास हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. यात पालिकेच्या लसीकरणापेक्षा खासगी लसीकरणाचे प्रमाण अधिक होते.

बुधवारी मुंबईमध्ये ५० हजार ८०७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात खासगी रुगणालयांमध्ये झालेल्या लसीकरण हे ३८ हजार ६३५ इतके असून पालिकेच्या लसीकरणावर झालेले लसीकरण हे ११ हजार १३६ इतके नोंदवण्यात आले. परदेशी जाणाऱ्या ३०३४ जणांमध्ये आतापर्यंत लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ या वयोगटातील ३५ हजार २०० जणांमध्ये लसीकरण करण्यात आले असून ही संख्या एकूण ६,२००१७ इतकी नोंदवण्यात आली आहे.

गुरूवारपासून ४५ वर्षांवरील गटासाठी पालिकेच्या मानखुर्द पीएमजीपीमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. १० ते ३ वाजेपर्यंत ऑनलाइन आगावू नोंदणी केलेल्यांचे लसीकरण केले जाणार आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा