संपामुळं सरकारी रूग्णालयात रुग्णांचे हाल, शस्त्रक्रियाही रद्द


SHARE

सातव्या वेतन आयोगासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपाला सुरूवात झाली अाहे. मुंबईतील जे.जे., कामा, सेंट जॉर्ज यांसारख्या अनेक नामांकित सरकारी रूग्णालयातील नर्स व वॉर्डबॉय संपावर गेल्यानं रुग्णसेवेवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. परिणामी रुग्णांचे चांगलेच हाल झाले. संपामुळं अनेक शस्त्रक्रियाही रद्द करण्यात अाल्या.


बाहेरून डाॅक्टर बोलावले

अनेक रूग्णालयांत २०० पेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थी व तज्ज्ञ डॉक्टरांना मदतीसाठी तर रुग्णालयांच्या सफाईसाठी ४० पेक्षा जास्त कामगारांना बाहेरून बोलावण्यात आलं अाहे. तसचं या सर्व रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून २४० परिचारिकांनाही तीन दिवसांच्या तात्पुरत्या सेवेकरिता कामावर घेतलं आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

७ वा वेतन आयोग लागू करून अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,  तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागांची तात्काळ भरती करावी, निवृत्तीचं वय ६० वर्ष करावे,  याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना २ वर्षाची बालसंगोपन रजा देऊन १ जानेवारी २०१७ पासूनच्या महागाई भत्त्याची थकबाकी रोखीन द्या, अादी मागण्या परिचारिका, वॉर्डबाॅय, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केल्या अाहेत. जे.जे. रुग्णालयातील मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर गेल्यानं अनेक ऑपरेशन रद्द करण्यात आली अाहेत. रुग्णांच्या खोलीमध्ये गोळ्या देण्यासाठी कोणीही नव्हतं. याशिवाय सध्या रुग्णालयाचा कारभार इंटर्न डॉक्टर बघत असून साफसफाई करणं, रुग्णांना गोळ्या देणं अादी जबाबदारी इंटर्न डॉक्टरांना देण्यात आली आहे. रुग्णालयातील फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
-  डॉ. सारंग दोनारकर,  जे .जे .रुग्णालयहेही वाचा -

सरकारी कर्मचारी संपावर, मंत्रालयात शुकशुकाट 

संबंधित विषय
ताज्या बातम्या