महाराष्ट्रात वर्षभरात क्षयरुग्णांच्या संख्येत १७ हजारानं वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. याबाबत संसदेत देशभरातील क्षयरुग्णांचा आकडा जाहीर करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०१७मध्ये १ लाख ९२ हजार ४५८ क्षयरुग्ण आढळले होते. तसंच, २०१८मध्ये ही संख्या २ लाख ९ हजार ५७४ एवढी झाली आहे. क्षयरुग्णांच्या सर्वाधिक संख्येमध्ये देशात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागत असल्याची माहिती या आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे.
देशभरातून अनेक जण टीबीवरील उत्तम उपचारासाठी मुंबई येतात. त्यामुळं दुसऱ्या राज्यातून रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असल्यानं महाराष्ट्राचा क्षयरोगाचा आकडा वाढल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
क्षयरुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्याबाबत केंद्र सरकारनं अनेक योजनाही तयार केल्या आहेत. टीबी रुग्ण शोधण्यासाठी दरवर्षी ३ विशेष मोहिम केल्या जातात. यंदाही एप्रिलमध्ये ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. २० राज्यांमध्ये ही मोहीम घेण्यात आली होती. त्यामध्ये २१०० टीबीचे रुग्ण आढळले असून त्यांना क्षयरोग झाल्याची माहिती नसल्याची माहिती मिळतं आहे.
हेही वाचा -
१०० दिवसांत वाहतूक सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन, प्रवासी संघटनांचा रेल्वेला इशारा
महापालिकेच्या स्ट्रक्चरल आॅडिटची 'कॅग'मार्फत चौकशी