Advertisement

वरळी पॅटर्नचं केंद्रीय पथकाकडून कौतुक, देशभर राबवण्याची शक्यता

मुंबईतील जी दक्षिण विभाग कोरोेनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. या ठिकाणी महापालिकेने राबवलेल्या वरळी पॅटर्नची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे.

वरळी पॅटर्नचं केंद्रीय पथकाकडून कौतुक, देशभर राबवण्याची शक्यता
SHARES

मुंबईतील जी दक्षिण विभाग कोरोेनाचा हाॅटस्पाॅट झाला होता.  जी दक्षिणमधील वरळीत अनेक रूग्ण सापडले. मात्र, या ठिकाणी पालिकेेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला रोखण्यात यश आलं. जी दक्षिणमध्ये कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी महापालिकेने राबवलेल्या वरळी पॅटर्नची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. केंद्राच्या पथकाने वरळी पॅटर्नचं कौतुक केलंय.   मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरळीत अतिशय चांगलं काम करून कोरोनाला आटोक्यात आणलं आहे.  वरळीतील कोळीवाडा सारखा दाट वस्तीचा प्रदेश पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी 500 बेडचं क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे.

वरळीतील कोळीवाडा हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथे 50 हजारांहून जास्त लोकसंख्या आहे. येथील घरांची रचनाही अगदी दाटीवाटीची आहे. त्यामुळे या ठिकाणी जर कोरोना वाढला असता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. कोळीवाड्यात अगदी सिलींडरपासून दुधापर्यंत सर्व गोष्टी घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे येथे कोरोनाला रोखण्यात यश मिळालं आहे. येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. गरम पाणी, जेवणासोबत रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी योगाचेही प्रशिक्षण इथं दिलं जात आहे.

पालिका प्रशासनाने इथली परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. याबद्दल केंद्राच्या पथकानेही प्रशासनाचं कौतुक केलं आहे. वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम काम करत आहे. केंद्राचं दुसरं पथकही वरळी भेट देऊन गेले, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे. हे पथक वरळी पटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत. तर, महापालिका राज्य सरकारकडे याचा आराखडा पाठवणार आहे.



हेही वाचा   -
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा