Advertisement

ठाणे महापालिकेच्या बसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये

रोज ठाण्यात किमान १०० ते १५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची उपलब्धता नाही.

ठाणे महापालिकेच्या बसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये
SHARES
Advertisement

मुंबईसह ठाणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रोज ठाण्यात किमान १०० ते १५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची उपलब्धता नाही. त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने परिवहन बसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये केलं आहे. 

ठाण्यात वेळेत रुग्ण वाहिका न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे ठाणेकरांमध्ये आरोग्य सुविधांबद्दल संताप वाढत चालला होता. त्यामुळे महापालिकेने मिनी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यचा निर्णय घेतला. त्यानुसार बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शुक्रवारी या बसेस ठाणेकरांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


ठाणे महानगर पालिका आणि रुग्णालये यांच्या अधिपत्याखाली या रुग्णवाहिका असून रुग्णवाहिकांच्या मागणीनुसार त्यांचा पुरवठा केला जाईल आणि गरज भासल्यास आणखी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येईल असं ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या बसेसची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि आणखी बसेस उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं.हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय
संबंधित विषय
Advertisement