Advertisement

कोरोना मृत्यूंचं ऑडिट होणार, ठाणे पालिकेचा निर्णय

कोरोना काळात अनेक मृत्यू हे संशयास्पद झाल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे सर्व कोविड मृत्यूचे ऑडिट करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती आहे.

कोरोना मृत्यूंचं ऑडिट होणार, ठाणे पालिकेचा निर्णय
SHARES

कोरोनामुळे झालेल्या सर्व मृत्यूंचे ऑडिट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी एका समितीची स्थापना केली आहे. सर्व मृत्यूचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कोरोना मृत्यूंचे ऑडिट करणारी ठाणे महापालिका पहिलीच महापालिका आहे.

कोरोना काळात अनेक मृत्यू हे संशयास्पद झाल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे सर्व कोविड मृत्यूचे ऑडिट करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती आहे. त्यानुसार राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सिव्हिल सर्जन डॉ. कैलाश पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. मुरूडकर, डॉ.  योगेश शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम हे सदस्य असून वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

ही समिती आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे अन्वेषण करून त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे. यामुळे नेमका मृत्यू कोविडमुळेच झाला की नाही, त्या रुग्णावर काय उपचार केले गेले, ते बरोबर होते की चुकीचे, सध्या जी उपचार पद्धती आहे ती बरोबर आहे की चुकीची अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ठाणेकरांना पुढील काही काळात मिळू शकतील.



हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा