Advertisement

मुंबईत लहान मुलांना होतोय 'हा' आजार

या आजारात पोटदुखीबरोबरच दोन ते तीन दिवस ताप, हगवण होते. तसंच या आजारात १०० टक्के रूग्णांना ताप येतोच.

मुंबईत लहान मुलांना होतोय 'हा' आजार
SHARES

 मुंबईत आता एका आजाराने शिरकाव केला आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णालयात कोरोनाची लागण झालेली १०० मुलं उपचार घेत आहेत. यातील १८ मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.

वाडिया रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभु यांनी याबाबत सांगितलं की, रुग्णालयात दाखल झालेल्या १०० कोरोना पॉझिटिव्ह मुलांपैकी १८ मुलांमध्ये PMIS ची लक्षणं दिसली आहे. कावासाकी आजारासारखी ही लक्षणे आहेत. मात्र, कावासाकी लहान मुलांमध्ये दिसून येतो. तर, PMIS  १० महिन्यांपासून ते 15 वर्षांदरम्यानच्या मुलांमध्ये दिसून येत आहे.

या आजारात पोटदुखीबरोबरच दोन ते तीन दिवस ताप, हगवण होते. तसंच या आजारात १०० टक्के रूग्णांना ताप येतोच. ८० टक्के मुलांना उलट्याही होतात. ६० टक्के मुलांचे डोळे लाल आहेत आणि इतरांच्या शरीरावर पुरळ आहे. जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

या आजाराची लक्षणे १० महिन्यांपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसून आली आहेत. १८ पैकी २ मुलांचा कोरोनातून निरोगी झाल्यानंतर या आजारामुळे मृत्यू झाला. वाडिया रुग्णालयाने इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला याबाबत माहिती दिली आहे.



हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा