Advertisement

विमान प्रवासासाठी राज्याच्या नव्या गाईडलाइन्स जारी


विमान प्रवासासाठी राज्याच्या नव्या गाईडलाइन्स जारी
SHARES

ऑमीक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं परदेशातून राज्यात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुधारणा केली आहे. कोरोना लसीकरण आणि उच्च जोखीम (हाय रिस्क) असलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांसाठी विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारनं वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हाय रिस्क असलेल्या देशांची नावे

राज्य सरकारनं जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये उच्च जोखीम असलेल्या देशांची नावे जाहीर केली आहेत. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे.

'हे' प्रवासी असतील उच्च जोखमीचे प्रवासी

 • राज्य सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च जोखीम असलेल्या प्रवाशांबाबतही माहिती दिली आहे. 
 • जे आंतरराष्ट्रीय प्रवासी उच्च जोखीम देश घोषित केलेल्या देशांमधून आले असतील असे प्रवासी उच्च जोखीम असलेले प्रवासी आहेत. 
 • ज्या प्रवाशांनी महाराष्ट्रात येण्याच्या १५ दिवसांपूर्वी उच्च जोखीम असलेल्या देशांना भेटी दिलेल्या असतील असे प्रवासी उच्च जोखीम श्रेणीत मोडणार आहेत.
 • अशा प्रवाशांना विमानतळावर प्राधान्याने उतरवण्यात येईल. 
 • त्याची तपासणी करणे आणि पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्यात असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाणार आहे.
 • अशा सर्व उच्च जोखीम असलेल्या विमान प्रवाशांना संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतलांवर लगेच तत्काळ आरटीपीसीआर टेस्ट द्यावी लागणार आहे. 
 • या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. 
 • सातव्या दिवशी पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी घेतली जाणार आहे.
 • या आरटीपीसीआर चाचणीत जर एखादा प्रवासी पॉझिटीव्ह आढळला तर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
 • जर सातव्या दिवशी त्या प्रवाशाची दुसरी आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली, तर त्या प्रवाशाला पुढील ७ दिवस घरी विलगीकरणात राहावे लागणार आहे.

देशांतर्गत विमान प्रवाशांसाठी 'हे' नियम

 • देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे.
 • विमानप्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट त्या प्रवाशाच्या जवळ असणेही बंधनकारक आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा