Advertisement

महापालिका तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ६ हजार खाटांच्या क्षमतेची ३ जम्बो केंद्रे उभारणार

येत्या काही दिवसांत म्हणजे, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळं महापालिकेनं नागिरकांच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे.

महापालिका तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ६ हजार खाटांच्या क्षमतेची ३ जम्बो केंद्रे उभारणार
SHARES

मुंबईसह (mumbai) राज्यभरात (maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, ही कोरोनाची दुसरी लाट असल्यातचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली. शिवाय, कोरोनाची दुसरी लाटही अतिशय तिव्र असून, या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसंच, लहान मुलांनाही या लाटेत कोरोनानं (coronavirus) लक्ष्य केलं. मात्र, असं असलं तरी येत्या काही दिवसांत म्हणजे, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळं महापालिकेनं नागिरकांच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे.

दुसऱ्या लाटेच्या अनुभवावरून नवीन येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. त्यानुसार भविष्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेनं आतापासूनच नियोजन सुरू केलं आहे. तसंच गोरेगाव येथील जम्बो कोविड केंद्रात दीड हजार खाटा वाढविण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहर, पूर्व आणि पश्चिम इथं प्रत्येकी २ हजार खाटांच्या क्षमतेची जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येत आहेत. तर महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोविड केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असल्यानं ५०० खाटांचं कोविड केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासकीय यंत्रणा तयार

ऑक्सिजन

पालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये सोळा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. याद्वारे दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. तसेच दोन हजार लीटर प्रतिमिनिट आणि तीन हजार लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तर रुग्णालयांना १० लीटर प्रतिमिनिट क्षमतेची सुमारे १,२०० प्राणवायू कॉन्सेट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोविड काळजी केंद्रे

७ जम्बो केंद्रे आहेत. तसेच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्र आहे. त्याचबरोबर मालाड, कांजूरमार्ग आणि शहरात प्रत्येकी एक कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे.

ऑक्सिजन खाटा

मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण १२ हजार ७४८ खाटा आहेत. गोरेगाव नेस्को केंद्रात एक हजार, महालक्ष्मी रेसकोर्सवरील जम्बो केंद्र दोनशे, तीन जम्बो केंद्रांमध्ये ७० टक्के ऑक्सिजन खाटा वाढविण्यात येणार आहेत.

या ठिकाणी वाढवणार इतक्या खाटा

  • १,५०० गोरेगाव नेस्को केंद्र
  • ९०० महालक्ष्मी रेसकोर्स केंद्र
  • २,००० प्रत्येकी तीन जम्बो कोविड केंद्रे



हेही वाचा -

पुणे - मुंबई धावणारी 'डेक्कन क्वीन' रद्द

मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा