Advertisement

मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ

गेले २ महिने इंधनाचे दर स्थिर होते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर दरवाढ सुरू झाली.

मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ
SHARES

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले असले तरी शुक्रवारी पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. मे महिन्यात एकूण ८ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले २ महिने इंधनाचे दर स्थिर होते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर दरवाढ सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

इंधनाच्या कच्च्या किंमतीत घट असूनही तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी किंमती वाढवल्या आहेत. त्यानुसार, पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये (mumbai) विक्रमी उंचावर आहेत. त्याचबरोबर देशातील बर्‍याच भागात पेट्रोल १०० च्या वर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील (maharashtra) परभणी येथे पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे भाव

  • दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर ९२.३४ रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८२.९५ रुपये झाले आहे.
  • मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.०९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
  • कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
  • भोपाळमध्ये पेट्रोल १००.३८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटरला विकले.
  • लखनौमध्येही पेट्रोलचे दर ९० पार झाले आहेत. पेट्रोल .९०. १८ आणि डिझेल ८३. ३३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.



हेही वाचा -

वाशी, ऐरोली, नेरुळ पालिका रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारासाठी ओपीडी

येत्या आठवड्यापासून प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू होणार?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा