Advertisement

ठाण्यातही कोरोनाचे ३ संशयीत, घराबाहेर न पडण्याचा इशारा

ठाण्यात (thane coronavirus suspected) कोरोनाचे ३ संशयीत रुग्ण आढळून आले आहे. या तिन्ही रुग्णांमध्ये अद्याप कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नसली, तरी खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठाण्यातही कोरोनाचे ३ संशयीत, घराबाहेर न पडण्याचा इशारा
SHARES

ठाण्यात (thane coronavirus suspected) कोरोनाचे ३ संशयीत रुग्ण आढळून आले आहे. या तिन्ही रुग्णांमध्ये अद्याप कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नसली, तरी खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोण आहेत हे संशयीत?

दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची (Coronavirus update) लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य सहलीनिमित्त दुबईला गेले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईहून मुंबईला उतरले त्या विमानातील सर्व महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चाचणी करण्यात येत आहे. अशा ४० प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला आहे. सोबतच ज्या टॅक्सीचालकाच्या गाडीत ते बसले होते, त्या टॅक्सी चालकाच्या संपर्कात आलेल्या ७ ते ८ जणांचीही चाचणी करण्यात आली. 

याच टॅक्सीचालकाने (cab driver) दुबईतील दाम्पत्याला सोडल्यानंतर ठाण्याचं भाडं घेतलं होतं. यांत ३ महिला प्रवासी पुण्याहून ठाण्यात आल्या होत्या. यापैकी दोघीजणी मानपाडा, तर एकजण पाचपखाडी परिसरातील आहे.

महाराष्ट्रात ११ रुग्ण

दरम्यान, कोरोना व्हायरसची (coronavirus update) लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढून ११ झाली आहे. यामध्ये ८ पुण्यातील, २ मुंबईतील आणि १ जण नागपूरमधील रुग्ण आहेत. ठाणे शहर मुंबईला लागून असल्याने शहरात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाण्यात आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसंच राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सर्व शाळा-काॅलेजांमध्ये कार्यक्रम, सभा न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. एअर इंडियाने इटली आणि दक्षिण कोरिया या दोन देशांतील विमानसेवा बंद केल्या आहेत. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा