Advertisement

कर्करोगावर मात केलेले रुग्ण करणार कर्करोगग्रस्तांची सेवा!


कर्करोगावर मात केलेले रुग्ण करणार कर्करोगग्रस्तांची सेवा!
SHARES

परळच्या टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये स्वत: कर्करोगावर उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण आता याच रुग्णालयातील कर्करोगग्रस्तांना सेवा देऊ शकणार आहेत. शिवाय, पदवीधर किंवा ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, ज्यांना रुग्णालय, रुग्ण याबाबतची माहिती आहे किंवा ज्यांनी कर्करोग झालेल्या रुग्णांची सेवा केली असेल, अशा व्यक्ती कर्करोगग्रस्तांना सेवा देऊ शकणार आहेत.

टाटा मेमोरिअल सेंटर आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या पुढाकाराने 'अॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन' (केइव्हॅट) हा एक वर्षाचा पूर्ण वेळ असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. येत्या २८ फेबुव्रारीला टाटा मेमोरिअलच्या वर्धापन दिनी या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचं टाटा रुग्णालयात अनावरण करण्यात येणार आहे.

वर्षाला ७൦ हजार रुग्ण टाटा रुग्णालयात कर्करोगासाठी उपचार घेत असतात. ज्यावेळी रुग्ण कर्करोगासाठी रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा त्याला एका वेळी अनेक उपचारांची गरज असते. त्यामुळे कधी-कधी आम्हालाही बऱ्याच गोष्टी रुग्णांना सांगता येत नाहीत. पण, या केअरगिव्हरना दिलेल्या प्रशिक्षणामुळे रुग्णांना त्याचा फायदा होईल.

डॉ. विनीत सामंत, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक, टाटा ममोरिअल रुग्णालय


अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य काय?

काळजी वाहकांना (केअरगिव्हर्स) व्यावसायिक पातळीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील रुग्णांची निदान प्रक्रिया, उपचार पर्याय आणि उपलब्ध स्त्रोत या सर्व टप्प्यांवरील प्रशिक्षण काळजीवाहकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रुग्णांना पूर्णपणे बरे होण्याच्या प्रक्रियेत समुपदेशन, आर्थिक पाठबळ, मदत यासाठीही हे मार्गदर्शन केलं जाणार आहे. ६ महिने थिअरी आणि ६ महिने प्रॅक्टिकल असं हे प्रशिक्षण असणार आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनीत सामंत यांनी दिली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा