वोक्हार्ट रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण

वोक्हार्ड्ट रुग्णालयातर्फे या उपक्रमार्तंगत मुंबईतील ५०हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

SHARE

दरवर्षी मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पासाठी सादर केलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यावेळी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान, यंदा अशी परिस्थिती उद्भभवू नये यासाठी मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयानं एक अनोखा उपक्रम राबविला आहे. वोक्हार्ट रुग्णालयातर्फे या उपक्रमार्तंगत मुंबईतील ५० हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

५० हून अधिक मंडळ

मुंबई सेट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयातील परिसरात शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी मुंबईसह उपनगरातील ५० हुन अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता. यावेळी या सार्वजनिक गणेश मंडळांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. तसच, मेडीकल कीटही देण्यात आली. त्याशिवाय, गर्दीच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कार्डिअॅक अरेस्ट झाल्यास (हृदयक्रिया बंद पडल्यास) हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरणार असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी म्हटलं.

सर्वांत मोठा उत्सव

गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वांत मोठा उत्सव असून, देश आणि परदेशातील लोक यात सहभागी होण्यासाठी येतात. या १० दिवसात प्रचंड धांदल असते, त्यामुळं वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारच्या वैद्यकीय आणिबाणी हाताळण्यात गणेश मंडळांना मदत करण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्स मुंबईतील ५०हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचे प्रशिक्षण देणार असल्याचं मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी सांगितलं.हेही वाचा -

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

पुरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळंसंबंधित विषय
ताज्या बातम्या