Advertisement

सायन रुग्णालयाचा प्रताप; मानवी व्हेंटिलेटरच्या सहाय्यानं रुग्णावर उपचार

व्हेंटिलेटर बंद पडल्यानं शकीलच्या नातेवाईकांनी दुसऱ्या व्हेंटिलेटरची मागणी केली. परंतु रुग्णालयातील ११ व्हेंटिलेटरचा वापर सुरू असून व्हेंटिलेटर रिकामी होईपर्यंत तुम्ही मानवी व्हेंटिलेटरचा वापर करा असं शकीलच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं.

सायन रुग्णालयाचा प्रताप; मानवी व्हेंटिलेटरच्या सहाय्यानं रुग्णावर उपचार
SHARES

मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांना देण्यात येणारं कपडे न मिळाल्यानं ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली होती.  रुग्णालयाच्या अशा भोंगळ कारभाराचा प्रत्यय अाल्यानंतर अाता रुग्णालयाचा एक प्रताप उघडकीस अाला अाहे.  या रुग्णालयाने मरणाच्या दारात असलेल्या एका रुग्णाला तब्बल आठ तास चक्क अम्बू बॅगच्या श्वसनयंत्रणेवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर अाला अाहे. व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळत सायन रुग्णालयाने हा प्रताप केला.


नेमकं प्रकरण काय?

शकील अहमद (४०) असं या पीडित रुग्णाचं नाव असून ते वाशी नाका परिसरात राहणारे अाहेत. मंगळवारी शकील मानखुर्द परिसरात काही कामासाठी गेले असता त्यांना एक रिक्षाने धडक दिली. त्यांना तात्काळ  मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु गोवंडीच्या रुग्णालयात उपचारासाठी लागणारी उपकरणं व सोयीसुविधा नसल्यानं त्यांना तातडीनं सायनच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. शकील यांच्या डोक्यातून बराच रक्तस्त्राव झाल्यान त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.


व्हेंटिलेटर बंद पडलं

सायन रूग्णालयात डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्यांना श्वसनासाठी एक कृत्रिम नळी बसवली. ही नळी व्हेंटिलेटरला जोडल्यानं श्वसनाचा त्रास थोडा कमी झाला. मात्र  काही वेळानं ते व्हेंटिलेटर बंद पडलं. व्हेंटिलेटर बंद पडल्यानं शकीलच्या नातेवाईकांनी दुसऱ्या व्हेंटिलेटरची मागणी केली. परंतु रुग्णालयातील ११ व्हेंटिलेटरचा वापर सुरू असून व्हेंटिलेटर रिकामी होईपर्यंत तुम्ही मानवी व्हेंटिलेटरचा वापर करा असं शकीलच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं.


८ तास अम्बू बॅगचा वापर

त्यानुसार रुग्णालयानं शकील यांना श्वसनासाठी एक अम्बू बॅग देऊन तिच्यात हवा भरण्यासाठी एक पंप दिला. नातेवाईक शकील यांचा जीव वाचवण्यासाठी पंपाच्या सहाय्यानं अम्बू बॅगमध्ये हवा भरत होते. १५ ते २० मिनिट प्रत्येक जण आळीपाळीनं असे ८ तास नातेवाईक  अम्बू बॅगमध्ये हवा भरण्यासाठी पंप करत होते. या कालावधीत अम्बू बॅगनं पम्पिंग करणं बंद केलं असते किवा त्यात काही बिघाड झाला असता तर शकील यांचा मृत्यू झाला असता. कुटुंबियाकडून व्हेंटिलेटरची वारंवार मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केलं. एका पत्रकराने रुग्णालयाचे डीनला व्हेंटिलेटर देण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर व्हेंटिलेटर देण्यात अाले.
 


शकील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करून श्वसनासाठी एक कृत्रिम नळी बसवली. ही नळी व्हेंटिलेटरला जोडल्यानं त्यांच्या श्वसनाचा त्रास थोडा कमी झाला. मात्र,  व्हेंटिलेटर अचानक बंद पडलं. यावेळी रुग्णालयातील ११ व्हेंटिलेटरवर रुग्ण होते. त्यामुळं त्यांना अम्बू बॅग देण्यात आली.  व्हेंटिलेटर रिकामी होताच त्यांना व्हेंटिलेटवर हलवण्यात आलं.
 -  डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक रुग्णालय, सायनहेही वाचा -

महापालिका शाळांत कुपोषणमुक्तीचा फाॅर्म्युला कुठला? 'प्रजा'चा महापालिकेला सवाल 

संबंधित विषय
Advertisement