Advertisement

दिलासादायक! राज्यात 'डेल्टा प्लस'चे २ रूग्ण पूर्णपणे बरे

मुंबईत डेल्टा-प्लस ही २ प्रकरणं ५ एप्रिल आणि १५ एप्रिलच्या सुरुवातीला कोविड पॉझिटिव्ह होती. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून हा व्हेरिएंट शहरात आहे.

दिलासादायक! राज्यात 'डेल्टा प्लस'चे २ रूग्ण पूर्णपणे बरे
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटनं राज्यात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली होती. मात्र आता दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे २ रूग्ण बरे झाले असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत डेल्टा-प्लस ही २ प्रकरणं ५ एप्रिल आणि १५ एप्रिलच्या सुरुवातीला कोविड पॉझिटिव्ह होती. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून हा व्हेरिएंट शहरात आहे. त्यापैकी एक ठाणे येथील रहिवासी असून त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले होते, तर दुसरे एक ७८ व्यक्ती आहेत. डेल्टा-प्लसमुळे ग्रस्त बहुतांश लोकांनी लस घेतली नसल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वरिष्ठ नागरिक आता ठीक झाले असून सध्या त्यांना कोणतीही तक्रार नाहीये. या व्यक्तीच्या घरातील एक व्यक्तीही पॉझिटीव्ह आली होती, मात्र आता त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा