Advertisement

कोरोनाची लस घेतल्यानंतरही दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

डोस घेतल्याच्या काही दिवसानंतरच डॉक्टर आणि आरोग्य सेविकेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतरही दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
SHARES

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि एका आरोग्य सेविकेनं लसीचा पहिला डोस घेतला. पण आता बातमी समोर आली आहे की, डोस घेतल्याच्या काही दिवसानंतरच या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

तज्ञ म्हणाले की, लसीचा पहिली डोस मिळाल्यानंतरही लोकांनी जागरुक राहण्याची आणि सुरक्षा आणि आरोग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे, हे यावरून स्पष्ट होतं. दोघांनाही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (एसआयआय) निर्मित केलेली कोविशिल्ट ही लस घेतली होती.

डॉक्टरनं (४६) ३० जानेवारी रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. तथापि, साधारण नऊ दिवसांनी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, लसीच्या डोसनंतर चार दिवसांत आरोग्य सविकेला कोरोना झाल्याचं कळालं. दोघांनाही मध्यम संसर्ग झाला असून सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मरोल इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात डॉक्टर उपचार घेत असल्याची माहिती आहे. ते म्हणाले, “मी आता सावरत आहे आणि मला आनंद आहे की मला कोणत्याही ऑक्सिजन प्रणालीची गरज नाही लागली.”

9 फेब्रुवारीला शरीरात वेदना, ताप, वाहणारे नाक ही लक्षणं आढळल्यानंतर डॉक्टरनं कोरोना चाचणी केली. जेव्हा चाचणी सकारात्मक आली, तेव्हा त्याला आरटी-पीसीआर चाचणी झाली जेणेकरून दुप्पट खात्री व्हावी. त्याचे निकाल देखील पॉझिटिव्ह आले.

आरोग्य सेविकेला १६ जानेवारीला लसीकरण मोहीमेत लस दिली. ताप आल्यानंतर अवघ्या ४ दिवसात कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. तिच्या वॉर्डातील एका डॉक्टरानं सांगितलं की, तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचार म्हणून रेमॅडेव्हिव्हर देण्यात आले. चांगली बातमी अशी आहे की, आरोग्य कर्मचारी आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यानं पुन्हा काम सुरू केलं आहे.

वाडिया रुग्णालयाचे रोगप्रतिकार तज्ज्ञ डॉ. मुकेश देसाई म्हणाले की, सर्वसाधारणपणे ही लस एखाद्या व्यक्तीच्या सिस्टममध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकते. विशेषतः लसीचे २ डोस दिले तर फायदा होऊ शकतो. पण एकच लस पूर्णपणे संरक्षण देत नाही.

डॉ. देसाई म्हणाले की, जेव्हा दुसरा डोस मिळाल्यानंतर १५ दिवसानंतर एखाद्या व्यक्तीनं पॉझिटिव्ह चाचणी घेतली तेव्हाच या लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. तज्ञ म्हणतात की लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक प्रतिसादासाठी सुमारे १०-१५ दिवस लागू शकतात.



हेही वाचा

हेही वाचा

राज्यातील बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात- सुनील केदार

विलगीकरणातील चार प्रवासी हॉटेलमधून पळाले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा